Sunday, December 1, 2024

/

हृदयविकाराचा झटका आला तर चटकन जा त्यासाठीच्याच इस्पितळात

 belgaum

आज बेळगाव live च्या वतीने आम्ही आवाहन करतोय की हृदय विकाराचा झटका आला की चटकन जा त्याचसाठीच्या म्हणजेच हृदय विकारांवर उपचार करणाऱ्या विशेष इस्पितळांमध्ये. याचे कारण असे आहे की लोक हृदयविकाराचा झटका आला की लोक असे करण्याऐवजी इकडे तिकडे जाऊन वेळ घालवतात. आणि वेळ गेल्यावर हार्ट हॉस्पिटलला जातात. शेवटच्या घटकेला डॉक्टर काहीच करू शकत नाहीत आणि रुग्णही वेळेत योग्य उपचार न झाल्याने दगावतो.
शुक्रवारी सकाळी असाच एक दुर्दैवी प्रकार घडला. एक महिलेला पहाटेपासून अचानक छातीत दुखू लागले होते. तिला आधी तीन ते चार इस्पितळांमध्ये नेऊन शेवटी एक हृदय विकारांवरच काम व उपचार करणाऱ्या इस्पितळात नेण्यात आले. तोपर्यंत उशीर झाला होता आणि ती महिला दगावली.
या घटनेत चूक त्या शेवटच्या इस्पितळाची नक्कीच नाही. योग्य माहितीच्या अभावाने त्या महिलेला इतर ठिकाणी घेऊन जाऊन वेळ घालवलेल्यांची चूक आहे. त्यांनीही ती मुद्दाम केली नाही आपल्या रुग्णाला योग्य उपचार व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करताना ही चूक नकळत केली आहे. आशा चूका इतर रुग्णांच्या बाबतीत होऊ नयेत ही काळजी घ्यावी लागणार आहे.
या साठी जनजागृतीची गरज असून बेळगाव live च्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.
फक्त बेळगावलाच नव्हे तर सम्पूर्ण देशभरातच ही स्थिती आहे. विदेशात हृदयविकाराचा झटका आला की पाच ते आठ मिनिटात योग्य इस्पितळात पोचविले जाते. आपल्याकडे याबद्दल माहितीचा अभाव आहे आणि अनेक गैरसमज कारणीभूत आहेत. यासाठी असा रुग्ण इतर इस्पितळात आल्यास त्यांनीही दिशाभूल करत वेळ घालवण्यापेक्षा तशा रुग्णांना वेळीच योग्य इस्पितळांची वाट दाखवण्याची गरज आहे.
बेळगावात केएलई हार्ट फौंडेशन 0831 2473777, विजया हॉस्पिटल 9481404055 आणि महात्मा फुले रोड वरील लेकव्ह्यू चे हार्ट हॉस्पिटल 0831 2403333 याठिकाणी हृदयवीकारावर उपचाराची सोय असून त्यांच्या रुग्णवाहिकाही आहेत. याशिवाय 108 रुग्णवाहिकेचा वापरही करता येतो. याची नोंद घ्या आणि योग्य उपचार घ्या मृत्यू टाळा हीच विनंती.Heart attack

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.