बेळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि आय एफ एस अधिकारी असलेले तसेच सध्या भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातील साक्षरता आणि शालेय शिक्षण विभागाचे संचालक हे पद भूषविणारे गिरीश होसुर यांना स्वच्छ भारत योजना अंतर्गत मंत्रालय गटातील मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
दिल्ली येथे झालेल्या एका समारंभात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पूर्वी ते बेळगाव जिल्हा वनसंरक्षणाधिकारी म्हणून काम पहात होते. स्वच्छ विद्यालय मोहिमेत त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शाळांमध्ये स्वच्छ भारताचा संदेश पोचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार होसुर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे देशातील ६.५ लाख शाळा आणि २.६७ कोटी विध्यार्थी सहभागी झाले.
Trending Now