बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी आगामी 10 आक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणी संदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सोबत चर्चा केली.
गुरुवारी सकाळी बारामती येथे मध्यवर्ती समिती अध्यक्ष दिपक दळवी,खजिनदार प्रकाश मरगाळे,महेश जुवेकर, दत्ता उघाडे यांनी पवार यांची भेट घेतली आहे.
जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे भारतात आले असून आपण उद्या दिल्लीला जात आहोत त्यावेळी त्यांची भेट घेतो तुम्ही दिल्लीला आल्यावर भेटा अस आश्वासन पवार यांनी समितीच्या शिष्टमंडळास दिल. यावेळी केंद्र सरकारच्या वकिलांनी घेतलेली महाराष्ट्र विरोधी भूमिके बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा आढाव हे देखील यावेळी उपस्थित होते.
10 रोजी सुनावणी होणार
मागील सुनावणी वेळी कर्नाटकाने आपला वकील आजारी असल्याने पुढील तारीख मागितली होती त्यामुळं सुनावणी होऊ शकली नाही. आजारी असलेल्या कर्नाटकाचे वकील पी पी राव यांच निधन झाल्याने 10 रोजी निर्धारित होणारी सुनावणी होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्राच्या वतीनं सुनावणी साठीची सर्व पूर्ण तयारी केली असून या तारखेला अंतरिम अर्ज 11,12 13 14 वर सुनावणी होणार आहे. कोर्टातील सुनावणी साठी अड राजाभाऊ पाटील आणि दिपक दळवी शुक्रवारी दिल्लीला रवाना होणार आहेत.