कपिलेश्वर मंदिर ते जुन्या धारवाड रोड ला जोडला जाणारा महाद्वार रोडचे 45 फूट रुंदीकरण केले जाणार आहे.या भागातली रहदारी नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने हा रोड 45 फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा रस्ता बनवण्यासाठी महा पालिकेने 45 लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे कालच स्थानिक नगरसेवक आणि पालिका अभियंत्यांनी रोड ची पाहणी करून रहिवाश्यांना अतिक्रमण काढून घेण्याचं अवाहन केलं.
रस्ता रुंदीकरणास पाठींबा ध्याअसेआवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं स्थानिकांना करण्यात आलंय. पालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिकांना 15 दिवसांचा अवधी देखील दिला आहे अशी देखील माहिती मिळाली आहे