देसुर ता पं सदस्या सुळगे (ये) येथील काजल किरण पाटील यांचे सासरे शिवाजी पाटील यांना नवहिंद मल्टी पर्पज च्या कर्जवसुली पथकाने बेदम मारहाण केली आहे.
७६ वर्षीय शिवाजी पाटिल यांना येळ्ळूर रोड येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शिवाजी यांनी सदर सोसायटीत २५००० रुपयांचे कर्ज घेतले होते. आर्थिक स्थिती खराब असल्याने त्यांनी ते भरले नाही.
शिवाजी यांचे पुत्र काँग्रेस नेते किरण पाटील यांनी या सोसायटीने आपण काँग्रेस पक्षाचे असल्याने ही मारहाण केल्याचा आरोप केला आहे. काही पोलिसांना घेऊन सोसायटीचे पथक आले होते त्यांनी घरातील सोफा आणि २ दुचाकी उचलून नेल्या, कर्जाची व्याजासह रक्कम दोन लाखाच्या घरात असून ती देण्याची तयारी आपण आर्थिक नुकसान सोसून केली तरी त्यांनी ऐकले नाही, बेदम मारहाण केली असे आरोप झाले आहेत.
हे मारहाण प्रकरण आता ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत गेले असून पोलिसांनी तपास केल्यावरच चूक कुणाची हे सिद्ध होईल, पण एक वृद्धावर नवहिंद च्या पथकाने हात उचलायला नको होते असे लोक बोलत आहेत.





