परवा रेल्वे ओव्हर ब्रिजचा एक फोटो हवा होता पण आमचे फोटोग्राफर जवळ नव्हते म्हणून मी बंडूला फोन केला तू कुठे आहेस, बंडूने सांगितले मी शास्त्रीनगर मध्ये दांडियाचे फोटो काढायलोय, मी म्हटले एक अर्जंट रेल्वे ब्रिजचा फोटो हवा आहे तो देशील का? त्याने क्षणाचाही विलंब न लावता रात्री 01 वाजता तो फोटो काढून तरुण भारत च्या वाट्स आपवर पाठवला आणि सकाळी तो प्रसिद्ध झाला, असे उदगार तरुण भारतचे व्यवस्थापक उपेंद्र बाजीगर यांनी काढले, ते कै यल्लापा उर्फ बंडू मोहिते यांच्यासाठी आयोजित शोकसभेत बोलत होते.
शनिवारी (ता ३०) रोजी कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कै बंडू यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुजरात भवन येथे शोकसभेचे आयोजन केले होते,
सुरुवातीला प्रसाद प्रभू यांनी प्रास्तविक केले,
जेष्ठ स्वातंत्र सैनिक गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, माजी महापौर विजय मोरे, अनंत लाड, महादेव पाटील, डी बी पाटील, यांच्या हस्ते कै बंडू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.आणि दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली.
यानंतर जायंट्स मेन च्या वतीने बोलताना महादेव पाटील यांनी कै बंडू मोहिते यांच्या कुटुंबियांसाठी जाहीर केलेल्या निधीचा तपशील सांगितला, आणि जास्तीत जास्त निधी जमा करण्याचे आवाहन केले,आणि जायंट्स मेन च्या वतीने श्रद्धांजली वाहिली,
अनंत लाड बोलताना म्हणाले की बंडू हा माझा विद्यार्थी होता, एक हरहुन्नरी फोटोग्राफर म्हणून तो सर्वाना परिचित होता, पण त्याच्या अकाली निधनामुळे त्याच्या कुटुंबियांवर फार मोठा आघात झाला आहे, त्यांना सर्वांनी आर्थिक हातभार लावून बंडूच्या कुटूंबियांना मदत करण्याचे आवाहन केले,
जायंट्स मेन च्या वतीने मदन बामणे यांनी त्यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असे सांगितले.
दत्ता जाधव म्हणाले की कै बंडू च्या अपघाताची बातमी सर्वात प्रथम मला समजली आणि त्याच्याबरोबर कोण कोण होते हेही मला माहित आहे, बंडू आमच्यातून गेलाय पण त्याच्या कुटुंबियांना जे बंडुबरोबर गेले होते त्यांनी मोठी मदत करून हातभार लावण्याचे आवाहन केले.
माजी महापौर विजय मोरे यांनी बोलल्याप्रमाणे गुजराथी समाज मदत करेल असा विश्वास व्यक्त केला, त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही स्विकारुया असे सांगितले,
गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी माझ्याकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असे सांगितले,
मराठी भाषिक युवा आघाडीच्या वतीने भाऊ गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली आणि कै बंडूच्या मुलाला सांगितले की केव्हाही काहीही मदत लागल्यास आम्हाला फोन कर आम्ही त्याची पूर्तता करू असे सांगितले.
यावेळी गुजराती समाजाच्या वतीने वीरेंद्र जडेजा,फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने डी बी पाटील, द्वारकानाथ उरणकर,यांनीही श्रद्धांजली वाहिली,शेवटी सर्वांनी पुष्पांजली वाहून श्रद्धांजली वाहिली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद प्रभू यांनी केले.
कै बंडू मोहिते यांच्या कुटुंबासाठी मदत निधी
सुनील अष्टेकर 10000/- शांताई विद्या आधार केंद्र विजय मोरे रोख 10000/- दत्ता जाधव रोख 10000/- डॉ सुरेश पाटील 10000/- अनंत लाड जायंट्स मेन रोख 5000/- रवि मालशेट 5000/- सरस्वती मंच सुनील बाळेकुंद्री 5000/- एम बी गौडा 5000/- अमित राच रोख 5000/- उमेश मजुकर 5000/- राजू सुतार रोख 1000/- उपेंद्र बाजीगर रोख 1000/- महेश हंडे जायंट्स परिवार रोख 2500/- विक्रांत पोटे पाटील जायंट्स परिवार चेक 1000/- राजू माळवदे जायंट्स परिवार रोख 1000/- भाऊ गडकरी मराठी भाषिक युवा आघाडी रोख 5000/- गोपाळ बापशेठ चेक 5000/- सुमन आणि रमेश श्रीखंडे रोख 5000/- दिलीप कुरुंदवाडे 10000/- किरण पाटील 5000/- बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ 5000/- पत्रकार विकास अकादमी 15000/- अतुल चतुर्वेदी रोख 5000/- शिवराज पाटील जायंट्स मेन रोख 1000/- प्रवीण चौगुले कला व्हिजन रोख 2000/- मारुती चिकोर्डे रोख 200/- नारायण सावंत रोख 1000/- द्वारकानाथ उरणकर 1000/- कान्हाभाई शहा 5000/- प्रवीण प्रभू रोख 2500/- संतोष गुरव रोख 2500/- विश्राम देशपांडे रोख 2000/- अनिकेत फोटो स्टुडिओ पिरनवाडी रोख 500/- लक्ष्मी फोटो स्टुडिओ मच्छे रोख 1000/- पियुष फोटो प्रताप आढाव रोख 500/- सुभाष माने जायंट्स मेन 1000/- सतीश गौरगोंडा 1000/- यांनी मदत जाहीर केली, यातील काही जणांनी रोख मदत दिली आहे,
1,52,700/-रू एकूण जमा
69,500?-रू रोख जमा
___________
83,200/-रू येणे बाकी
माहिती बातमी सौजन्य -महादेव पाटील