उड्डाण पूल समस्या बैठकीत खासदार विरोधी सूर
गेली बारा वर्षे खासदारकी भोगून गेल्या 13 वर्षात बेळगावचे बारा वाजवले आहे यांनी विकासाचा नाव घेऊ नये कारण यांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतलाय असा आरोप खासदार सुरेश अंगडी यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे सुजित मूळगुंद यांनी केला आहे.
उड्डाण पूल बैठकीत ते बोलत होते दक्षिण भागात अंबुलन्स अडकली परीक्षा काळात विधयार्थ्याना विलंब झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न देखील सुजित यांनी यावेळी उपस्थित केला.फक्त केंद्रच नव्हे तर उड्डाण पुलासाठी राज्य सरकारचा निधी असताना भाजपने श्रेय घेणे चुकीचं आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उड्डाण पुलासंदर्भात शुक्रवारी घेणार प्रादेशिक आयुक्तांची भेट जोवर जुन्या पी बी रोड उड्डाण पूल सुरू होत नाही ती पर्यंत रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू करू नये या शिवाय पहिल्या रेल्वे फाटकाची बॅरीकेट्स काढा आणि पर्यायी मार्ग सुरु करुन द्या अशी मागणी करण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊ असा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
बापट गल्लीतील गिरीश कॉम्प्लेक्स मध्ये उड्डाण पुला संदर्भात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीचे अध्यक्षस्थान जेष्ठ आर्किटेकट आर डी शानभाग होते तर यावेळीअड अशोक पोतदार अड नागेश सातेरी,नारायण सावंत,सुजित मुळगूदं,गणेश दड्डीकर,भागोजी पाटील,सुनील जाधव अनिल आजगावकर आदी उपस्थित होते.
शुक्रवारी दुपारी 12 वाजता प्रादेशिक आयुकत शिवयोगी कळसद यांची भेट घेऊन उड्डाण पुला बद्दल कल्पना देऊ असा देखील निर्णय यावेळी घेण्यात आला