दोन रिक्षांची आमोरा समोर टक्कर झाल्याने एक रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कंकनवाडी आयुर्वेदिक कॉलेज शहापूर समोर घडली आहे. माधवी विजय यककुंडी वय 40 वर्ष बसवाण गल्ली शहापूर अस मयत झालेल्या महिलेचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार टाटा एस रिक्षाने पेगो रिक्षाला जोराची धडक दिली यात पेगो रिक्षा पलटी झाली त्यामुळं रिक्षात बसलेल्या माधवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यात त्यांचा मृत्यु झाला आहे तर माधवी यांचे पती विजय यककुंडी सह चोघे जण जखमी झाले आहेत.विजय यककुंडी यांचे उजव्या हाताच बोट देखील तुटल आहे.बेळगाव रहदारी दक्षिण पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे. जखमीं वर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
(हाच तो रिक्षा नाथ पै सर्कल जवळ पलटी झाला होता)