बलात्कार झालेल्या पीडितेचे फोटो आणि नाव व्हाट्स अप्प ग्रुप वर प्रसारित केल्या प्रकरणी एका ग्रुप अडमीन वर पोकसो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.बेळगावातून चालवण्यात येणाऱ्या एका फेसबुक पेज च्या अडमीन युवकास अटक करण्यात आली आहे.
हारुगेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पेज द्वारे हारुगेरी येथे बलात्कार झालेल्या पीडित मुलीचं नाव आणि फोटो त्याने व्हाट्स अप्प ग्रुप वर प्रसारित केलं होतं.बेळगावातील आर पी डी सह अनेक व्हाट्स अप्प ग्रुप वर अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते.कायद्यानुसार पीडितेचा फोटो ब्लर करणे किंवा नाव बदलून वापरणे अस चालते मात्र या युवकांकडून कायद्याचा भंग झाल्याची तक्रार बाल कल्याण खात्याने पोलीस अधीक्षकाकडे केली होती त्यानुसार रायबाग हारुगेरी पोलिसांनी सदर ग्रुप अडमीन वर आय पी सी 117,153,आय टी ऍक्ट 167 तसेच सेक्शन 23 पोक्सो अक्ट अनुसार कारवाई करण्यात आली आहे.
काय आहेत गुन्हे त्यांची माहिती
IPc 117 जनतेकडून किंवा 10 पेक्षा जास्त लोका कडून गुन्हा करणाऱ्यास शिक्षा
IPc 153 बेकायदेशीर एकत्र होऊन हेतुपूर्वक खेळकर वृत्तीने किंवा अपायकारक वृत्तीने जोर किंवा हिंसा उत्पन्न करून गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे
पोक्सो pocso section 23-
पूर्ण आणि अधिकृत माहिती असल्या शिवाय मीडिया मध्ये प्रसारित करू नये- प्रसारित केल्यास वयक्तिक माहिती किंवा फोटो गोपनीय ठेवावे.