स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात छोडो भारत चळवळ सुरू केली होती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत जोडो आंदोलन सुरू केलं आहे असं मत खासदार सुरेश अंगडी यांनी व्यक्त केलं आहे.
सोमवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आवारात स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते सुंदर भारत बनवण्यासाठीच जोडो भारत अभियान मोदींनी हाती घेतल असून प्रत्येकाने स्वच्छता अभियानात प्रत्येकाने प्राधान्य द्यावे अस देखील आवाहन अंगडी यांनी केलं आहे. यावेळी कॅटोंमेंटच्या वतीनं स्वच्छतेच्या कार्यक्रम सहभागी झालेल्यांना पुरस्कार वितरण करण्यात आला. स्वच्छता विभागात कॅटोंमेंट मराठी स्कुल प्रथम क्रमांक देण्यात आला यावेळो विध्यार्थी योगेश मजुकर याला पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ब्रेगेडिअर गोविंद कलवाड,कॅटोंमेंट सी इ ओ दिव्या शिवराम, कॅटोंमेंट उपाध्यक्ष साजिद शेख आदी उपस्थित होते.
Trending Now