ऐन दसऱ्याच्या सणात शहरात अनेक दुःखद घटना घडताना दिसत आहेत त्यात आणखी एका घटनेची भर पडली असुन माजी उपमहापौर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या वृद्ध सासू सासऱ्यांनी एकाच वेळी आत्महत्त्या केली आहे. नारायण लक्ष्मण किल्लेकर वय 80, वसुंधरा नारायण किल्लेकर वय 68 अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री दोन च्या सुमारास न्यु गुडसशेड रोड येथील विमल प्लाजा अपार्टमेंट च्या पॅसेज मध्ये या वृद्ध दाम्पत्यांने एकाच वेळी गळफास लावून घेऊन आत्महत्त्या केली आहे. सोमवारी पहाटे सहाच्या दरम्यान वाचमन पॅसेज मध्ये गेला असता त्याने ही घटना पाहून सर्वांना याची कल्पना दिली.
खडे बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. आत्महत्त्येचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही .
एकीकरण समितीच्या महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर आणि परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यात बेळगाव live सामील आहे.
अचानक घरातील जेष्ठ मंडळींनी स्वतःचे जीवन सम्पवणे धक्कादायक आहे, याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
अतिशय दुःख द गोष्ट मनाला चटका लावणारी