बेळगाव शहरातील एक हरहुन्नरी फोटोग्राफर यल्लापा उर्फ बंडू मोहिते यांच शनिवारी (30) रोजी अपघाती निधन झालं आणि साऱ्या फोटोग्राफी विश्वावर शोककळा पसरली, बंडू सुरुवातीला टी व्ही चॅनलसाठी फोटोग्राफी करायचा नंतर वर्तमान पत्रासाठी प्रेस फोटोग्राफर म्हणून कार्य करू लागला, पुढे प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून अनेक संस्थांसाठी त्याने फोटोग्राफी केली.
रविवारी सायंकाळी ६-०० वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले,
यावेळी विविध संस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, पत्रकारांच्या वतीने प्रसाद प्रभू, सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अनंत लाड, बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या वतीने जहागिरदार, गुजराथी समाजाच्या वतीने धनंजय पटेल, शांताई विद्या आधार केंद्राच्या वतीने माजी महापौर विजय मोरे, फोटोग्राफर असोसिएशनच्या डी बी पाटील आणि जायंट्स मेन च्या वतीने महादेव पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
बंडू मोहिते यांची परिस्थिती बेताची असल्याने उपस्थित मान्यवरांनी बंडू मोहिते यांच्या कुटुंबाचा आधारवडच नाहीसा झाल्याने अंतिमविधीच्या वेळी त्यांच्या तीन मुलांच्या दोन मुली आणि एक मुलगा यांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी सामाजिक बांधिलकी म्हणून घेण्याचे आवाहन केले, आणि एखादी मोठी रक्कम त्यांच्या कुटुंबाच्या नावे फिक्स डिपॉजीट करून त्यातून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे ठरले,
यासाठी काही मान्यवरांनी त्याच ठिकाणी रक्कम जाहीर केली,
सुनील अष्टेकर १००००/- शांताई विद्या आधार केंद्राच्या वतीने माजी महापौर विजय मोरे १००००/- दत्ता जाधव १००००/- अनंत लाड ५०००/- रवि मालशेट ५०००/- सरस्वती मंच च्या वतीने सुनील बाळेकुंद्री ५०००/- जेष्ठ पत्रकार एम बी गौडा, ५०००/- अमित राच ५०००/- उमेश मजूकर ५०००/- उपेंद्र बाजीगर १०००/- राजू सुतार १०००/- अशी मदत जाहीर केली आहे, आणि ज्या कोणाला द्यायची आहे त्यांनी विजय मोरे 9844268687 आणि महादेव पाटील 9481535528 यांच्याशी संपर्क साधावा.
त्याचप्रमाणे बुधवार ता ४ रोजी गुजराथ भवन शास्त्रीनगर येथे दुपारी ४-०० वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.