कार आणि ट्रक मध्ये आमोरा समोर होणारी टक्कर चुकवण्यासाठी कार ने झाडाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात छायाचित्रकार बंडू मोहिते ठार तर अनिल पटेल सह अन्य तिघे जखमी झाले होते. चोरला रोड वर सुरल जवळ कर्नाटक गोवा सीमेवर हा अपघात शनिवारी रात्री हा अपघात घडला होता.
घटने नंतर बंडू यांना उपचारासाठी साखळी गोवा इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
रविवारी सकाळी अकरा वाजता पणजी येथील हॉस्पिटल मध्ये बंडू यांच्या मृतदेहावर शल्य चिकित्सा केल्या वर नातेवाईकांच्या हवाली करण्यात येणार असून पणजी हुन अंबुलन्स द्वारे मृतदेह बेळगावला आणण्यात येणार आहे.रविवारी सायंकाळी पाच च्या सुमारास सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या वर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. यावेळी बेळगाव पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
Trending Now
Best person
God bless his soul