बंडू उर्फ यल्लप्पा मोहिते हे एक छायाचित्रकारंच नव्हे तर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते, त्यांचा झालेला हा असा अचानक अपघाती मृत्यू बेळगावला धक्का देणारा आहे.
ते सगळीकडे बंडू या नावानेच ओळखले जात होते, आपल्या कलेच्या जोरावर अनेक आय एएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या ते जवळचे होते वृत्तपत्रे आणि चॅनेलसाठी फोटोग्राफी करण्या बरोबरच अनेक सामाजिक सेवा संस्थांशी त्यांचा सम्बन्ध होता. जायंट्स या संस्थेशी ते संलग्न होते.
त्यांच्या मृत्यूने त्यांच्या परिवाराची हानी झाली आहे, तर बेळगावचे प्रेस, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचीही हानी झाली आहे.
Trending Now