Tuesday, December 24, 2024

/

फोटोग्राफर बंडू मोहिते यांचं अपघाती निधन

 belgaum

गोव्या हुन बेळगाव कडे परततेवेळी कार पलटी होऊन झालेल्या अपघातात बेळगावचे फोटोग्राफर बंडू उर्फ आनंद मोहिते(वय 55) फुलबाग गल्ली बेळगाव यांचं निधन झालं आहे.
याबाबत बेळगाव live ला मिळालेल्या  माहितीनुसार बंडू हे काही कामा निमित्य आपल्या मित्रासहं गोव्याकडे गेले होते रात्री ते परतत असतेवेळी कार पलटी होऊन झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी साखळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र काहीच उपयोग न होता त्यांचा मृत्यु झाला आहे.बंडू यांच्या सोबत अनिल पटेल  होते अशी देखील माहिती मिळाली आहे.त्यांच्या गाडीला कर्नाटक हद्दीत अपघात झाला होता त्यांना उपचारासाठी म्हणून जखमी अवस्थेत दुसऱ्या गाडी तुन साखळी कडे नेण्यात आले होते.तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली .त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा आणि आई असा परिवार आहे

सुरुवातीच्या काळात बंडू यांनी इन बेलगाम या स्थानिक वृत्त वाहिनीला काम केलं होतं तसेच ते अनेक वृत्त पत्रांना फ्री लान्स फोटो ग्राफर म्हणून काम करत होतेBandu mohite.बंडू यांच्या अचानक झालेल्या निधनाने बेळगाव प्रेस फोटो ग्राफर जगतास मोठा धक्का बसला आहे.गेल्या महिन्यात कन्नड साहित्य भवन येथे आयोजित प्रेस फोटो ग्राफरांच्या फोटो प्रदर्शनात त्यांनी आपले फ़ोटो लावत महत्वाचा वाटा उचलला होता.अश्या या ज्येष्ठ फोटोग्राफरला  बेळगाव live च्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली….

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.