रोटरी क्लब ऑफ बेळगाव च्या वतीने आज बेळगावात ज्येष्ठ सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम यांनी ऐकण्याची संधी मिळणार आहे.
केएलईच्या जिर्गे सभागृहात आज सायंकाळी ५.३० वाजता हे व्याख्यान आहे. मुंबई वरील दहशतवादी हल्ले या विषयावर ते बोलणार आहेत.
उज्वल निकम यांनी अनेक महत्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. १९९३ ची मुंबई दंगल, अभिनेता संजय दत्तसह इतर आरोपींना शिक्षा मिळवून देताना कोणतेही भय आणि आमिषाला ते बळी पडले नाहीत, अजमल कसाब विरोधातील खटला असो किंवा सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमाना शिक्षा असो त्यांनी निर्भयपणे आरोप सिद्ध करून दाखवले आहेत.
आज ते आपले मामाचे गाव असलेल्या बेळगाव मध्ये येत आहेत, लहानपणी जिथे सुट्ट्या घालवल्या तेथे त्यांचे व्याख्यान होईल.
आमची जबाबदारी एकच हे व्याख्यान ऐकण्याची, चला तर मग त्यांचे विचार ऐकूया.
Trending Now