Sunday, December 22, 2024

/

शहापूर वेंकटेश मंदिराचा रथोत्सव

 belgaum

-विजयादशमीनिमित्त शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या शहरातील लक्ष्मी नारायण आणि शहापूरमधील  लक्ष्मी वेंकटेश मंदिराचा रथोत्सव भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला . बेळगावमधील लक्ष्मी नारायण मंदिराच्या रथोत्सवाला नरगुंदकर भावे चौकातून प्रारंभ झाला . शहापूरमधील रथोत्सवाला लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाकडून प्रारंभ झाला .

फुलांच्या माळा ,ऊस यांनी रथाची सजावट करण्यात आली होती . रथाच्या प्रदक्षिणा मार्गावर सडा घालून रांगोळ्या काढून रथाचे स्वागत करण्यात येत होते . सुहासिनीकडून  रथातील देवतेची आरती ठिकठिकाणी करण्यात येत होती . तरुणी आणि महिला रथाच्या समोर टिपऱ्या ,फुगडी  घालत होत्या . अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी देखील रथावर करण्यात आली . Venktesh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.