चष्म्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने विहिरीत उडी टाकून आत्महत्त्या केल्याची घटना नार्वेकर गल्लीत घडली आहे.राजेश रघुनाथ पाटील वय 48 वर्ष रा गवळी गल्ली बेळगाव अस आत्महत्त्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
घटना स्थळावरून समजलेल्या माहितीनुसार राजेश हा गेली 36 वर्षा पासून मधु नाईक सन्स या चष्म्याच्या दुकानात काम करत होता गेले काही दिवस तो आजारी असल्याने नाराज दिसत होता.शनिवारी सकाळी तो कामावर आला होता दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या विहिरीत त्याने उडी टाकली आणि आत्महत्त्या केली. या घटने मागचे नेमकं कारण कळू शकलेलं नाही .घटनास्थळी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अडगळीत असलेल्या विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढला.खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
Trending Now