आज रेल्वे ओव्हर ब्रीजच्या संदर्भात निवेदन देताना त्यात ‘बेळगांव’ शहराचा ‘बेळगावी’ असा उल्लेख करण्यात आला.हे निवेदन देताना जरी सर्वभाषीय आणि सर्वपक्षीय नागरिक उपस्थित असले तरी तिथं मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते. मागील वेळी निवेदन देतेवेळी निवेदनात तब्बल 13 वेळा बेळगावी असा उल्लेख होता यावेळी हा आकडा 9 वर पोचला आहे.मागील निवेदना वेळी देखील सोशल मीडियातून मराठी नेत्यांच्या कानपिचक्या काढण्यात आल्या होत्या तरी देखील याकडे दुर्लक्षच झालं आहे.
बेळगावचे ‘बेळगावी’ हे नामकरण आज देखील समितीशी नाळ जुळलेल्या नागरिकांची भळभळती जखम आहे. अशावेळी समितीशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती तिथं उपस्थितीत असताना ‘बेळगावी’ हा नामोल्लेख मराठी लोकांना खटकून गेला. पुढील वेळेपासून याची कटाक्षाने हे टाळावे अशी चर्चा बेळगांव भागात सुरू आहे.
बेळगांव हे बेळगावच आणि याला कोणी विलांटी लावून संबोधु नये , कारण बेळगांव मराठी माणसाचे आहे. आणि आता याचे नांव बदलून अतिक्रमण केले जात आहे तरी प्रत्येक मराठी माणसाने यांचा विरोध केला पाहिजे!