प्लास्टिकच्या भरणीतील भात खात असताना तोंड अडकलेल्या कुत्र्याला तरुणाच्या प्रसंगावधाणामुळे जीवदान मिळाले. घटना आहे बेळगाव शास्त्रीनगर भागातली…
दुपारी चार च्या सुमारास प्लास्टिकच्या भरणीत असलेला भात खायला कुत्र्याच्या पिल्लाने भरणीत तोंड घातले होते त्यावेळी त्या कुत्र्याचं तोंड भरणीत अडकल होत त्याच वेळी या भागातून गणेश दड्डीकर जात होते त्यांनी याकडे लक्ष देऊन सदर कुत्र्याच तोंड प्लास्टिक भरणीतून बाहेर काढून जीव वाचवला आहे.
रागाच्या भरात कुत्रा ओरडत असेल चावा घेईल म्हणून कुत्र्याकडे कोणी जात नव्हते अश्या स्थितीत गणेश दड्डीकर यांनी प्लास्टिक भरणीतून कुत्र्याचं तोंड बाहेर काढून जीव वाचवला.यावेळी केवळ कुत्र्यानेच नव्हे तर बघ्यांनी देखील सुटकेचा श्वास सोडला