राज्य सरकार कडून पालिकेस दरवर्षी नगरविकास योजने अंतर्गत 100कोटींचा विशेष फंड मिळत असल्याने बेळगाव शहराच्या सुशोभीकरणास मदत होते आहे.
याच 100 कोटी अनुदानातून कित्तूर चनम्मा चौक ते कृष्णदेवराय चौका पर्यंत पूर्ण रस्ता प्रकाशमय होत आहे.या संपूर्ण रस्त्याच्या दुभाजकावर आकर्षक लाईट खांब बसवण्यात येत आहेत या शिवाय फूट पाथ आणि दुभाजकाला सिंगापूर पद्धतीने हायटेक बनविण्यात येत आहे त्यामुळं हा रस्ता आंतरराष्ट्रीय दर्जाचा असा फुल्ल स्मार्ट रास्ता होणार आहे.
या रस्त्यावरील सर्व विद्युत खांबांना काढून टाकण्यात आले असून विद्युतव्यवस्था अंडर ग्राउंड करण्यात आली आहे. बेळगावात होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनात हा रस्ता उदघाटन करण्याचे प्रयत्न पालिका आयुक्तांनी चालविले आहेत.याच रस्त्या प्रमाणे शहरातील इतर रस्त्यांना झळाळी मिळावी यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत अशी मागणी केली जात आहे.
Trending Now
Dada te Kolhapur circle aahe krishna devaray circle kon nahi mhanat….!!
Dada te chananmma Circle te Kolhapur circle as aahe krishna devaray circle kunalach mahit nahi aahe so Kolhapur circle asch naav ghya