पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच ब्रिजबद्दल निर्णय – जिल्हाधिकाऱ्यांच आश्वासन

0
205
 belgaum

रेल्वे उड्डाण पुलाच काम कधी सुरू करायचं याबद्दल अजून निर्णय झाला नसुन येत्या दोन तीन दिवसांत पोलिसांकडून ट्रॅफिकचा अहवाल आल्यावरच यावर निर्णय घेऊ अस अश्वांसन एस जिया उल्ला यांनी रेल्वे उड्डाण पुला बाबत दिल आहे.
बेळगावातील विविध संघ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी डीसिनीं हे आश्वासन दिलं आहे. जुन्या पी  बी रोड ब्रिज उदघाटन केल्यावरच नवीन रेल्वे पुलाच काम सुरू करा अशी मागणी या शिष्टमंडळाने केल्यावर जिल्हाधिकारयानी 25 डिसेंम्बर पर्यंत जुना पी बी रोड चे लोकार्पण होईल असं ठेकेदाराने सांगितलं आहे त्यामुळं सगळ्या गोष्टींचा बैठकीत विचार करून लोकांना कसं कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेऊन निर्णय घेतला जाईल अस देखील जिल्हाधिकार्यानी स्पष्ट केलं.

प्रादेशिक आयुक्त देखील घेणार बैठक

विविध  संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक आयुक्त शिवयोगी कळसद यांची देखील भेट घेऊन जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली यावेळी कळसद यांनी रेल्वे उड्डाण पुला बाबत जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पालिका आयुक्तांची बैठक घेऊन जनतेचे त्रास कसे कमी करता येतील यासाठी प्रयत्न करू अशो ग्वाही दिली.Cop

 belgaum

तीन दिवसांत देणार ट्रॅफिक अहवाल-कृष्ण भट्ट

रेल्वे उड्डाण पुल वाहतुकीच्या वापरासाठी ट्रायल बेस वर बंद करून अनेक ठिकाणी डायवर्शन केले आहेत जनतेला किती त्रास होतो याचं अध्ययन केलं जातं आहे.येत्या तीन दिवसात ट्रॅफिक रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाईल त्यानंतर डी सी योग्य निर्णय घेतील अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी शिष्टमंडळास दिली आहे.

गेले चार दिवस ट्रॅफिक पोलीस 16 तास काम करत आहेत कमी स्टाफ असून देखील ट्रॅफिक हाताळत आहोत जनतेच्या सूचनांची गरज होती ती निवेदनातील घेऊन जिल्हा प्रशासनास देणाऱ्या रिपोर्ट मध्ये घातली जातील अस देखील भट्ट म्हणाले.यावेळी वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.