संगोळी रायन्ना सोसायटीचे अध्यक्ष आनंद अप्पूगोळ यांचा जामीन परत फेटाळण्यात आला आहे. थर्ड जेएमएफसी न्यायालयात त्यावर आज निकाल देण्यात आला आहे. कमी व्याज दर देऊन रायन्ना संस्थातर्फे ठेवी, गुंतवणूक करून घेऊन नंतर पैसे परत दिले नाही. याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. यासाठी अटक करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अप्पूगोल फरारी होते मुंबईतुन अटक करून पोलिसांनी त्यांची हिंडलगाला कारागृहात रवानगी केली आहे. पण, तब्येतीच कारण पुढं करून आणि उच्च न्यायालयात पुढील चौकशीला स्थगिती दिली आहे त्यावर त्याबद्दल जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण, न्यायाधीशांनी जामीन फेटाळून लावला आहे. आता जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे.