महापालिका व्याप्तीत येणाऱ्या काही प्रभागात अनाधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा विभाग हेस्कॉम अधिकाऱ्यांनी कोणत्या तत्वावर मुलभूत सुविधा पुरविल्या आहेत यामुळे मोठया प्रमाणात पालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे असा आरोप करत अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी धारेवर धरलं.
मंगळवारी पालिकेत लेखा स्थायी समिती बैठक आयोजित करण्यात आली होती.
शहरातील अनेक अनाधिकृत बांधकामाना हेस्कॉम आणि पाणी पुरवठा खात्याने सुविधा दिल्या आहेत मात्र यातून पालिकेस नया पैसा लाभ नसून पालिके कडून परवानगी असलेल्याना सुविधा देण्यास अनेकदा हेलपाटे घालायला लावत आहे असा आरोप सरला हेरेकर यांनी केला तर विरोधी पक्ष नेते दीपक जमखंडी यांनी राजकीय वरदहस्ततुन अश्या कॉलनीना अभय देत सुविधा दिल्याचा आरोप केला .हेस्कॉम आणि पाणी पुरवठा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी स्थायी समिती बैठकीस हजेरी लावा अशी नोटीस काढा अशी सूचना सरला हेरेकर यांनी दिली.
हेरेकरांचं कन्नड प्रेम
पुढील स्थायी समिती बैठकीचा अजेंडा इंग्लिश ऐवजीं कन्नड मध्येच ध्या इंग्लिश मध्ये अजेंडा देणं अधिकाऱ्यांनी बंद करावा अशी सूचना सरला हेरेकर यांनी दिली.पालिकेत कन्नड भाषा न येणारे अर्ध्याहून अधिक नगरसेवक आहेत त्यांच्या साठी इंग्लिश मध्ये बैठकीचा अजेंडा दिला जातो मात्र हेरेकर यांनी इंग्लिशला विरोध करत आपलं कन्नड प्रेम दाखवलं आहे.