गेले काही दिवस शहरातील ट्रॅफिक जॅम वरून लोकांची कटकट कमी होणार आहे कारण जुन्या पी बी रोड उड्डाण पुलाच्या लोकार्पणा नंतरच रेल्वे उड्डाण पुलाच्या नवीन ब्रिज उभारणीच काम सुरू करत जाणार आहे त्यामुळे एक सामान्य बेळगावकरांच्या दृष्टिकोनातून दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे.
सिटीजन कौन्सिलच्या वतीनं दक्षिण पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल अभियंते(rob) पी व्ही शेट्टी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी शेट्टी यांनी सिटीजन कौन्सिलच्या शिष्टमंडळास वरील माहिती दिली आहे.
25 डिसेंम्बर पर्यंत जुन्या पी बी रोड उड्डाण पुलाच काम पूर्ण होणार असून सध्या ते युद्धपातळीवर सुरू आहे हे ब्रिज लोकार्पण करून रेल्वे ब्रिज च काम सुरू केलं जाईल आणि त्या नंतर तिसरे गेट ,पहिले गेट आणि दुसरे गेट अशी आणखी तीन उड्डाण पुलं बनवण्यात येतील अशी माहिती देखील शेट्टी यांनी सिटीजन कौन्सिलला दिली आहे.
सिटीजन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर हे सतत हुबळी रेल्वे मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते गेले काही दिवस सामान्य बेळगावकर जनतेच्या मनात ट्रॅफिक जॅम बद्दल भीती निर्माण झाली होती त्यामुळे कौन्सिल पदाधिकारयांनी रेल्वेअभियंत्यांची भेट घेऊन सामान्य माणसांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे. वरील माहिती रेल्वे अभियंते बेळगाव भेटी दरम्यान समोर आली आहे.सिटीजन कौन्सिल चे बसवराज जवळी विकास कलघटगी आदी यावेळी उपस्थित होते.
बॅरिकेट्स बद्दल डी सी घेणार निर्णय
रेल्वे उड्डाण पुलावर ट्रायल बेस वर बॅरिकेट्स लावून ब्रिज बंद करून अनेक ठिकाणी ट्रॅफिक डायवरशन करण्यात आलं आहे.डिसेंम्बर नंतर रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू होणार असल्याने ब्रिज वर लावलेले बॅरिकेट्स हटवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एस जिया उल्ला घेणार आहेत.