मित्रहो,
बेळगाव live च्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हर ब्रिज विषयी मी एक आवाहन करू इच्छितो, हे रेल्वे ओव्हर ब्रिज १०० वर्षापेक्षा जुने आहे, ते पाडवून नवे बांधा अशी विनंती करणारे पत्र ब्रिटिश सरकारने दिले होते, आणि आता रेल्वे खात्याने ते पडवून नव्याने बांधण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. पोलिसांनी पुढची रहदारीच्या समस्या होऊ नयेत म्हणून कालपासून प्रात्यक्षिक सुरू केले, पहिल्या दिवशी गर्दी झाली यातून अभ्यास करून उपाय राबविले गेले, आता परिस्थिती सुधारत आहे. तेंव्हा विरोध करीत बसने योग्य नव्हे.
आता काही दिवसांनी हे ब्रिज पूर्णपणे पडवळ जाईल आणि रस्ता बंद होईल, तेंव्हा आरडाओरड करून विकासाला आड येऊन आपली कोती प्रवृत्ती दाखवण्यापेक्षा आम्ही संयम पाळून विकासाला साथ द्यायला पाहिजे.
हे ब्रिज पुढे पडले आणि दुर्घटना झाली तर विरोध करणारे जबाबदारी घेणार नाहीत, त्यामुळे उगीच नेते बनून आड येणाऱ्यांची बाजू घेऊ नका. रहदारी पोलिसांच्या सूचना पाळा, रस्त्यांवर वाहतूक अडेल असे काही करू नका आणि योग्य पार्किंग करून रस्ते मोकळे ठेवा, हेच माझी विनंती.
आपला नम्र
एक बेळगावकर.