बेळगावचे जिल्हाधिकारी एस जिया उल्ला आणि प्रांताधिकारी कविता योगप्पन्नावर यांच्या निवासस्थानी एकाचवेळी साप आढळल्याने बरीच तारांबळ उडाली होती.सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडल्याने एकाच वेळी तीन सर्प आढळल्याने शासकीय निवासस्थानात बराच गोंधळ झाला होता.
वन खात्याच्या वतीनं लागलीच महिला सर्प मित्र निर्झरा चिट्टी यांना पाचारण करण्यात आले तब्बल दोन तासांच्या मेहनतीने निर्झरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरातील चेंबर मध्ये धामण सर्प पकडला तर प्रांताधिकारी कविता योगप्पन्नावर यांच्या घरासमोरील पाईप आणि बिळातील धामण सर्प पकडला. शासकीय अधिकाऱ्यांनी सर्प मित्र दंपत्तीच्या कार्याचा कौतुक केलं आहे
दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरात एकाच वेळी तीन साप आढळण्याची ही पहिलीच घटना आहे.एखाद्याच्या घरात सर्प आढळणे हे चांगलं लक्षण आहे की अपशकुन आहे याची चर्चा चांगलीच रंगली आहे