आंतरराष्ट्रीय ख्यात पावलेल्या रोटरी क्लब सारख्या संस्थने दोन दिवसांपूर्वी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.हा 26/11मुंबई दशहतवादी हल्ल्यावर आयोजित व्याख्यानाचा चांगला कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप आल्याचे चित्र समोर आले आहे.
गेल्या बऱ्याच दिवसानंतर बेळगावकर जनतेला चांगल्या व्याख्यानाची संधी मिळाली होती मात्र रोटरी क्लब सारख्या सेवा भावी संस्थेच्या व्यासपीठावर भाजपच्या आजी माजी आमदार द्वयी आणि खासदारांची उपस्थिती चांगलीच खटकली आहे.रोटरीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांची गर्दी पूर्वनियोजित होती की अचानक याबद्दल जोरात चर्चा चांगलीच रंगली आहे.जर भाजपच्या या नेते मंडळींना उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा असेल तर भाजपची निवडणूक पूर्व प्रचार सभाच घेतलं तर बरं झालं असतं अशी देखील चर्चा आहे एकूणच या कार्यक्रमाचे संयोजन चुकल्याने हा प्रकार घडला आहे.
खरंतर भाजपच्या नेत्यांना बेळगावात सध्या व्यासपीठ नाही आहे त्यामुळेच किमान अश्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेसमोर यावं अस वाटलं असावं त्यामुळे ते व्यासपीठावर अचानक प्रकट झाले.वास्तविक पाहता जेष्ठ नामांकित वकील किंवा न्यायाधीशा च्या कार्यक्रमाचा शिष्टाचार पाळण गरजेचं असताना या कार्यक्रमाच्या निमिताने तो पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आला आहे. रोटरीच्या कार्यक्रमात मंचावर भाजपच्या आजी माजी आमदार द्वयीचा वावर म्हणजे व्यासपीठ बळकावण्याचा प्रकार आहे.