प्रज्ञा पुणेकर या बेळगावकर कन्येने मिसेस इंडिया यु के हा मानाचा किताब पटकावत पुन्हा एकदा बेळगावचा नाव साता समुद्रापार उज्वल केलं आहे.
सौन्दर्यवती विवाहित महिलांसाठी युके येथे घेण्यात आलेल्या मिसेस इंडिया युके स्पर्धेत बेळगावची कन्या प्रज्ञा पुणेकर विजेत्या ठरल्या आहेत.
कौशल्य, ज्ञान, आत्मविश्वास आणि सौन्दर्य या कसोटीवर ही स्पर्धा झाली.
23 सप्टेंबर रोजी लंडन येथील मारिओट हॉटेल मध्ये झालेल्या स्पर्धेत ‘मिस इंडिया यु के 2017’ सोबत ‘मिस इंडिया युनिव्हर्स’हा देखील मानाचा किताब मिळाला आहे.
बेळगावातील एम व्ही एम शाळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षण झाल्यावर के एल एस मधून एम बी ए पूर्ण केलं होतं एच आर मध्ये एम बी ए असलेली प्रज्ञा युनायटेड किंगडम मध्ये नोकरी करत आहेत त्यांना प्रवास संगीत वाचनाची आवड आहे.बेळगावकर कन्येने सात समुद्रा पार मिळवलेल्या यशाबद्दल तीच बेळगाव live तर्फे अभिनंदन