देशात लोकशाही मजबूत व्हायची असेल तर विचारवंत जगायचे असतील विचारवंतांच्या हत्त्या थांबल्या पाहिजेत परंतु या हत्त्यांना राजकीय रंग देता कामा नये असं कट महाराष्ट्र सरकारचे विशेष वकील पदमश्री उज्वल निकम यांनी मांडले आहेत.
गेले दोन दिवस विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेळगावात आले असता रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.,रोटरीचे सचिन बिचू आणि अविनाश पोतदार यावेळी उपस्थित होते.
दाभोलकर पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या सारख्या विचार जगायचे असल्यास विचार वंतांच्या हत्त्या थांबल्या पाहिजेत अस ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय कायद्यात बदल हवा
देशा बाहेरील गुन्हेगाराबद्दल बोलताना निकम म्हणाले की अनेकदा प्रत्यार्पण मध्ये अडचणी येत असतात त्यामुळे अनेकदा गुन्हेगार मोकाट असतात यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे बदलासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.वकिलांनी देखील नैतिकता पाळली पाहिजेत समाजाचं नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजेत.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही मीडिया पूरक
आजच्या युगात पत्रकारांनी वास्तविकतेच भान ठेवत लिखाण करावं सत्यासत्यता पडताळावी जातीय तेढ सामाजिक वातावरण गडुळ होईल अश्या बातम्या टाळाव्यात समाजाच्या जडणघडणीत पूरक होतील अश्या बातम्या कराव्यात असे देखील निकम म्हणाले .इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया दोघेही एकमेकांत पूरक आहेत चुकीच्या बातम्या एकदम प्रसारित झाल्यामुळे सोशल मीडिया घातक ठरत आहे असं ते म्हणाले