भारतीया समोर अनेक आवाहन असून चीन आणि पाकिस्तानला रोखण्यासाठी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची गरज असून देशातील जाती धर्माच्या नावावर हेवेदावे बाजूला सारून मुकाबला करायला हवा अस मत विषेश सरकारी वकील उज्वल निकम यांनी काढले आहेत.
रविवारी सकाळी दुर्गामाता दौडीत सहभागी झाल्यावर ते बोलत होते.महापौर संज्योत बांदेकर, किरण गावडे,सचिन बिचचू उपस्थित होते.
पुढे काय होईल या भीतीने अपयशाने तरुणांनी हताश न होऊ नये मनात इच्छाशक्ती असल्यास नक्कीच यश आपलं आहे असं सांगत 1993 च्या बॉम्ब स्फोट खटल्या अगोदर आपण साधे सरकारी वकील होतो इच्छा शक्तीनेच आपणास मोठे बनवले अस देखील त्यांनी स्पष्ट केलं. माता भगिनी दुर्बल आहेत म्हणून कोणी अन्याय अत्याचार करत असलेल्या शक्तिचा मुकाबला युवकांनी करावा असा ते म्हणाले.
मी आज खऱ्या अर्थाने शिव प्रेमी झालोय बेळगावात मला आज नवीन दिवाळी पहायला मिळाली आहे प्रत्येक घरा समोर रांगोळी काढून दौडीच स्वागत तरुण तरुणींनी केलं आहे या देशाच्या दृष्टिकोणातून ही आनंदाची गोष्ट आहे.
शिव छत्रपतींची वागणूक शिकवणूक आम्हा मध्ये रुजलेली आहे हेच दाखवण्यासाठी हजारो शिव प्रेमी सहभागी झालेत याचा आणि बेळगावचा मला अभिमान आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.भर पावसात देखील हजारोंनी गर्दी जमलेली होती