बेळगावातील सांबरा येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संपादन केलेली जमिनीची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केल्याने प्रांताधिकारी कार्यालय(ए सी ऑफिस)जप्त करा असा आदेश बेळगाव प्रिन्सिपल सिव्हिल न्यायाधिशानी बजावला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी भुसंपादन करण्यात आल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली होती याबाबत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर न्यायालयाने आदेश देत शेतकऱ्यांना 1 वर्षाच्या आत 32 हजार 600 प्रति गुंठा 8 वर्षाच्या व्याजासह 38 लाख रुपये प्रति एकर अशी 100 एकर जमिनीची जवळपास 35 कोटी रूपये नुकसान भरपाई द्या असा 29 सप्टेंबर 2016 मध्ये दिला होता.गेले एक वर्ष झालं राज्य सरकार ने या निर्णया वर अपील सुध्दा केलं नव्हतं त्यामुळं कोर्टाने ए सी कार्यालय जप्तीचे आदेश दिले आहेत.
सांबरा येथील शेतकरी दिलीप चव्हाण , भुजंग जोइ , मारुती जत्राटी भागण्णा सनदी यांनी प्रांताधिकारी कविता योगप्पन्नावर यांची भेट घेऊन न्यायालयाच्या आदेशाची प्रत दिली यावर प्रांताधिकाऱ्यांनी आज बंगळुरूला जात असून लवकरच जमिनीची नुकसानभरपाई दिली जाईल असे आश्वासन दिलं आहे या शिवाय शेतकऱ्यांनी पोलीस आयुक्तांची देखोल भेट घेऊन कल्पना दिली आहे.सोमवार पासून आम्ही सरकारी कार्यालय जप्त कारवाईत सक्रिय होऊ अशी माहिती शेतकरी दिलीप चव्हाण यांनी बेळगाव live कडे दिली आहे