कोपर्डी घटने नंतर लोकांच्या मागणीमुळेच मला ही केस चालवायला मिळाली आहे त्यामुळे एक सरकारी वकील म्हणून या केस मध्ये सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असे उद्गार आहेत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे.
रोटरीच्या कार्यक्रमानिमित्त ते शनिवारी बेळगावला आले आहेत. सकाळी त्यांचे नातलग किर्तीकुमार देसाई यांच्या चिदंबर नगर येथील निवासस्थानी ते आले होते, यावेळी घरगुती गप्पाटप्पात त्यांनी माहिती दिली.
यशोधरा देसाई, लेखिका आणि ज्येष्ठ लेखक रणजित देसाई यांची कन्या पारू देसाई, सतीश तेंडुलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. निकम यांनी यावेळी बोलताना १९९३ नंतर देशातील काळ पूर्णपणे बदललेला आहे. अतिरेकीही तंत्रज्ञानात चार ते पाच टप्प्यांनी पुढे आहेत. त्याप्रमाणे आजच्या घटकेला राष्ट्रीय सुरक्षा योजनेत बदल होण्याची गरज आहे, अशी माहिती दिली.
धमक्या येणे ही माझ्यासाठी आता नवीन गोष्ट राहिली नाही, या धमक्यांमुळे उलट अतिरेकीच मला घाबरत आहेत. सध्या मला वेळ नाही मात्र पुढे निवृत्ती स्वीकारल्यानंतर कुत्रे या माझ्या आवडत्या प्राण्यांशी वेळ घालवायला आवडेल त्यांना प्रशिक्षित करायला आवडेल असे त्यांनी सांगितले.
त्यांनी बेळगावशी असलेल्या जुन्या स्नेहाची, इथल्या स्नेह्यांची आणि बालपणात मामाच्या गावी घालवलेल्या दिवसांची आठवण यावेळी ताजी केली. सिटीझन कोनसिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी बेळगावच्या व्यापार क्षेत्राची माहिती त्यांना दिली.
Trending Now