रिसालदार गल्ली येथील जुन्या महानगरपालिका इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रद्दीच्या गोदामाला अचानक आत्ताच आग लागली आहे.
हे गोदाम सरकारी आहे, आगीत जुने रेकॉर्ड आणि रद्दी जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा संशय असून शोध सुरू आहे.
सध्या आग विजवण्याचे प्रयत्न सुरू असून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे. पालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
Trending Now