Saturday, November 16, 2024

/

एशियन चॅम्पियनशीपमध्ये विश्वम्बर चा विश्वपातळीवर डंका

 belgaum

Belgaum atheleteगर्लगुंजी ( ता खानापूर ) येथील विश्वम्बर कोलेकरने आपल्या धावण्याच्या जोरावर बेळगाव जिल्ह्याचा डंका साऱ्या विश्वात पसरविला आहे. यंदा धावणे प्रकारात एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. तेथे अंतिम फेरीत पोचण्याचे दिव्य त्याने पार पाडलेच शिवाय जगभरातील धावपटूवर मात करीत तो सहावा आला आहे.
क्रीडाप्रशिक्षक एल जी कोलेकर यांचा तो मुलगा. लहानपणीच त्याच्यातील धावपटू त्याच्या वडिलांनी ओळखला यामुळे त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि एशियन चॅम्पियनशीपमध्ये पहिल्या तीन क्रमांकात तो आला नसला तरी त्याने विश्वपातळीवर आपले कर्तब दाखविले आहे.
एकूण ४८ देशांचे खेळाडू अंतिम फेरीत दाखल झाले होते. चीन, जपान, कुवेत सारख्या खेळावर आणि खेळाडूंच्या सरावावर भर देणाऱ्या देशातील धावपटूचा पराभव करणे तसे अवघडच. तरीही या स्पर्धेत त्याने बलाढ्य खेळाडूंना मागे टाकले.
मराठी विद्यानिकेतन मध्ये प्राथमिक शिक्षण घेताना त्याने राज्यपातळीवरील स्पर्धा गाजवण्यास सुरवात केली होती, ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तो राज्यात पहिला आला यामुळे सुवर्णपदकाची कमाई केली होती, पुढे सेंट्रल हायस्कूल मध्ये असताना एनसीसी मध्ये क्रॉस कंट्री स्पर्धेत त्याने सुवर्ण पटकावले होते. कर्नाटक विद्यापीठाच्या ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने यश मिळवले होते.
एशियन स्पर्धेसाठी जाण्यापूर्वी त्याच्या याच यशस्वी कारकिर्दीची दखल घेऊन निवड करण्यात आली, दिल्ली, लखनौ, केरळ, सिकंदराबाद, बंगळूर, पटियाला, ओरिसा येथे निवड चाचण्यांना त्याला सामोरे जावे लागले.
दररोज ५ ते ६ तास धावण्याच्या सरवातून तो या क्षणाला पोचला आहे.अशा स्पर्धेला जाणारा तो पहिला विध्यार्थी ठरला आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.