आगामी विधानसभा निवडणुकीत मी शिमोगा येथील शिकारीपूर मधून लढणार नसून त्या ऐवजी उत्तर कर्नाटकातील विजापूर किंवा बागलकोट जिल्ह्यातून लढवणार अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुरप्पा यांनी दिली आहे.बेळगावातील सांबरा विमान तळावर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. उत्तर कर्नाटकातून निवडणूक लढवाव अशी सूचना राष्ट्रीय अध्यक्षांनी दिली आहे त्यामुळं उत्तर कर्नाटकातील एका मतदार संघातून निवडणार असून अजून कोणता मतदार संघ ते ठरवलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हुक्केरी येथील कार्यक्रमानिमित्य ते बेळगाव दौऱ्यावर होते.
भाजपच्या काळातच सुवर्ण सौध चे निर्माण झालं असून सौधच निर्माण होऊन कित्येक वर्षे झाली असली तरी या भागाचा विकास खुंटला असल्याचा आरोप करत पुन्हा भाजप सत्तेत आल्यास केवळ24 तासाच्या आत सरकारची चार मुख्य कार्यालय बेळगाव सुवर्ण सौध मध्ये स्थलांतर होतील वर्षाचे 325 दिवस कामकाज चालेल अस देखील येडियुरप्पा पुढे म्हणाले.यावेळी उमेश कती, रमेश कत्ती खासदार अंगडी संजय पाटील पी डी धोत्रे,अनिल बेनके अभय पाटील आदी उपस्थित हो