राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा की नाही आणि बसवला तर वर्गणी राष्ट्रीय राजकीय लोकांकडून घ्यावी की नको यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती.
बुधवारी रात्री पुतळा नवीन बसवावा का यासाठी गावातील युवकांची बैठक आयोजित केली होती यावेळी भाजपचे दत्ता पवार आणि काँग्रेसचे सिद्धप्पा छत्रे या दोघांतून वाद झाला. एकेकाळी समितीत कट्टर असलेले छत्रे आणि पवार हे गेल्या काही दिवसपूर्वीच राष्ट्रीय पक्षात सामील झाले आहेत गावात एकमेकांविरुद्ध राष्ट्रीय पक्षातून उभे ठाकले आहेत.
कडोली येथे समिती विरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांत पुतळा बसवण्या वरून राजकारणं झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती राजहंसगड मध्ये होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.राजहंस गडातील एक गट काँग्रेस नेत्यांच्या आर्थिक मदतीने नवीन पुतळा बसविण्यास उत्सुक असून दुसरा गट त्यास विरोध करत आहे. बेळगावातून शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी देखील बैठकीस हजेरी लावून वाद शमवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाली आहे.