महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपकभाई केसरकर यांच्यासमोर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील नाराजगटाने आपली व्यथा मांडली आहे. समिती मधील दुफळीचा फटका सलग दोनवेळा या मतदारसंघात बसला आहे, आगामी निवडणुकीतही हा धोका असून आपण महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या प्रयत्नातून ही बेकी दूर करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
या मतदारसंघात सलग दोनवेळा समितीचे दोन उमेदवार निवडणूक लढवत असून याचा फायदा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला होत आहे. हक्काचा आमदार नसल्याने जनतेला यमयातनेला सामोरे जावे लागत आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी प्रयत्न करावेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यात पुढाकार घ्यावा, यासाठी आपण मध्यस्थाची भूमिका निभावावी अशी मागणी केली आहे.महाराष्ट्राने याकडे लक्ष ध्यावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे