घटस्थापनेपासून दसऱ्याच्या उत्साहात लक्ष्मीच्या नव रूपांचे पूजन होते. या रुपांपैकीच एक बुद्धीची देवता शारदा. बेळगावातल्या महिला या नवरात्रीच्या उत्साहात शारदोत्सव साजरा करतात. यंदाच्या या उत्सवाने ४७ व्या वर्षात पदार्पण केले आहे, या उत्सवाची सुरुवात आज गोगटे रंगमंदिरात दुपारी तीन वाजता अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या हस्ते होणार आहे.
शारदोत्सवाची ही महिलांना व्यासपीठ मिळवून देणारी परंपरा १९७१ साली कै लक्ष्मीबाई केळकर यांनी सुरू केली. ही परंपरा आजही जपत समस्त बेळगावकर महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले जाते. शहरातील ३० महिला मंडळे यात सहभागी होतात हे विशेष.
चार महिला एकत्र आल्या की भांडण आणि गॉसिपिंग शिवाय दुसरे काही करू शकत नाहीत हा आरोपही शारदोत्सवाने पुसून टाकला आहे. महिला आणि समाज प्रबोधन, मनोरंजन, कलादर्शन या बरोबरच पूर भूकंप सारख्या आपत्तीत आडल्या नडलेल्यांना मदतीचा वसा जपला आहे.
आजवर अनेक मान्यवरांचे विचार या सोहळ्यात ऐकायला मिळाले आहेत, यंदा अभिनेत्री सविता या उदघाटनांतर बोलताना आपले अनुभव कथन करणार आहेत.
आज सुरू होऊन २५ सप्टेंबर पर्यंत हा उत्सव चालेल .जय शारदे म्हणत अविरत सुरू असलेल्या या उत्सवाला बेळगाव live च्या शुभेच्छा.
Trending Now