केंद्रीय कौशल विकास राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांचा रविवारी धावता बेळगाव दौरा झाला यावेळी बेळगाव भाजपकडून हेगडे यांच थंडे स्वागत झाले.
वास्तविक त्यांना उत्तर कर्नाटकच्या कोट्यातून केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा कालचा पहिलाच दौरा होता प्रमुख सरकारी अधिकारी असोत किंवा भाजपच्या दोन पैकी एकही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते मात्र बेळगावातील विधान सभा निकडणुकीत इच्छुक असलेल्या प्रमुख उमेदवारांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
केंद्रीय राज्य मंत्र्यांचा बेळगाव दौरा अचानक असल्यानेच की काय कार्यकर्त्यांची धावपळ उडाली कोणताही ठोस कार्यक्रम मंत्र्या समोर नसल्याने मोठी गर्दी देखील झाली नव्हती.हेगडे यांचा खानापूर दौरा निश्चित होता बेळगाव दौरा अचानक ठरल्याने त्यातच मोदींचा वाढ दिवस जिल्हा इस्पितळात भेट देऊन उरकून घेतला.
हेगडे हे केंद्रीय कौशल्य विकास खात्याचे राज्य मंत्री आहेत मात्र ते बेळगाव दौऱ्यात कोणतेच कौशल्य दाखवण्यात कमी पडल्याची चर्चा होती