गेली दहा वर्षे तालुका समितीतील दुहीमुळे मराठी भाषकाचा विधानसभेत पराभव होत आहे त्यामूळे आगामी विधान सभा निवडणुकीत स्वार्थ सोडून बाजूला येऊ अशी मागणी करत तालुका समिती नेतृत्वाला कार्यकर्त्यांनी जाब विचारला.
दर शनिवारी कॉलेज रोड येथील समिती कार्यालयात बैठक असते या बैठकीत तालुक्यातील विविध गावातून कार्यकर्ते जमत असतात. गेले काही दिवस 70 जण कार्यकर्ते एकीसाठी प्रयत्नशील आहेत, त्यातीलच काही कार्यकर्त्यांनी सर्वसमावेशक भूमिकेसाठी तगादा लावला आहे.
शनिवारी झालेल्या या बैठकी दरम्यान पूर्वभागातील सागर नावाच्या युवा कार्यकर्त्याने सगळ्या नेत्यांनी स्वार्थ सोडून एकत्र येऊ आणि आगामी निवडणूक जिंकू अशी मागणी करत नेतृत्वाला धारेवर धरलं यावेळी उमेदवारी साठी इच्छुक असलेल्या नेत्याने गेल्या दोन निवडणुकात पराभव झाला तरीही मी काम करतच जनतेत आहे त्यामुळं जनता ठरविलं तो उमेदवार देऊ अशी भूमिका घेतली तरी देखील त्या पूर्व भागातील कार्यकर्त्यांच समाधन झालं नव्हतं सगळ्यांनी स्वार्थ बाजूला ठेऊन एका व्यासपीठावर येणे गरजेचे आहे अशी भावना?त्याने व्यक्त केली. तर मागील वेळेपेक्षा आता संघटना वाढी साठी का बैठका कमी आहेत असे म्हणत पश्चिम भागातल्या कार्यकर्त्याने जेष्ठ कार्यकर्त्यांने राम कोण आणि रहीम कोण?कौशल्या कोण आणि कैकई कोण असा म्हणत येणारा काळ याचे उत्तर देईल त्यामुळे स्वार्थ बाजूला टाका असे सुनावले यावेळी निरुत्तर झालेल्या नेत्याने बैठक आटोपती घेतली.
गेले काही दिवस बेळगाव live ने तालुक्यात मराठी भाषिक उमेदवार विधान सभेत दिसावा यासाठी सातत्याने भूमिका मांडली आहे हीच भूमिका या नेत्याने आपल्या मनात ठसवावी ही इच्छा आहे.