बेळगाव भाजप महानगर विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून भाजपचे जेष्ठ नेते शंकरगौडा पाटील याची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य प्रदेश भाजप अध्यक्ष बी एस येदूरप्पा आणि राज्य कार्यकारिणी ने पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकीत बेळगाव उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रभारी म्हणून पाटील हे कार्यरत असणार आहेत.केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना उत्तर तर आमदार शशिकला जोलले यांना दक्षिण मतदार संघाच निवडणूक प्रभार बनविण्यात आले आहे
निवडणुकीपूर्वी बेळगावातील दोन्ही मतदार संघातील स्थितीचा आढावा घेत किती जण इच्छुक आहेत निवडून येण्याची क्षमता कुणाकडे अधिक आहे हा अहवाल तयार करून प्रदेशाध्यक्षाकडे पाठवणे तसेच शहरात दोन्ही जागांवर भाजप कसे निवडून येईल याची योजना तयार करणे,निवडणुकीचा सगळं प्रभार अशी पक्षीय जबाबदरी शंकरगौडा पाटील यांच्याकडे असणार आहे.
शंकरगौडा पाटील यांनी याअगोदर 1994 साली शहरातून,2000 साली उचगाव 2008 सालीं उत्तर मधून विधानसभा लढवली होती तर बुडा अध्यक्ष पद देखील भूषविले होते . सध्या ते राष्ट्रीय किसान मोर्चा च्या अध्यक्षपदी कार्यरत असून याअगोदर त्यांनी पक्षातील अनेक मोठ्या पदावर यशस्वी कार्य केले आहे त्यामुळेच पक्ष श्रेष्ठींनी त्यांना उत्तर दक्षिण चे निवडणूक प्रभारी बनविले आहे.
पुढील विधानसभेत भाजपला यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावू पक्ष श्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी चोख पार पाडू अशी माहिती पाटील यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली आहे.