भारतीय लष्कराचा स्थापना दिन गुरुवारी एच क्यू २१ मध्ये थाटात साजरा करण्यात आला. चार अधिकाऱ्यांनी बेळगावात दाखल होऊन उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळवल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर चे ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांना आसाम रायफल चे नेतृत्व करताना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल युद्ध सेवा मेडल ने गौरवण्यात आले आहे.
कमांडो विंग चे कर्नल एस चॅटर्जी यांनाही बिहार रेजिमेंट चे नेतृत्व करताना कामगिरी बद्दल युद्ध सेवा मेडल आणि ओरडीनान्स कोर्प चे मेजर मनोज कुमार(मरणोत्तर) यांना सेना मेडल दिल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
गेल्या वर्षी मे महिन्यात पुलगाव येथे दारू कारखान्यात उडालेल्या भडक्यात अनेक नागरी वस्तीतील लोकांचे आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांचे जीव वाचवत आपल्या प्राणाची आहुती दिली होती.श्रीमती बिना मनोज कुमार त्यांचा मुलगा वेदांत यांनी हुतात्मा मनोज कुमार यांचा सत्कार स्वीकारला.श्रीमती बिना आणि वेदांत हे बेळगावतच रहात आहेत. कमांडो विंग चे इन्स्ट्रक्टर मेजर कुलदीप सिंह यांना देखील त्यांच्या सहसा बद्दल सेना मेडल ने गौरावानवित करण्यात आले आहे.