बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागागातील जवळपास पाच प्रभागांना पाणी पुरवठा करणाऱ्या किर्लोस्कर रोड येथील नवग्रह विहिरीत नवीन पाणी उपसा मीटर बसवण्यात आला आहे. माजी महापौर आणि नगरसेविका सरिता पाटील यांच्या पाठपुराव्या नंतर सहा महिन्यांनी नवीन मीटर बसवण्यात आली आहे.
हुतात्मा चौकातील विहिरी नंतर याच नवग्रह विहिरीतील पाणी या भागात उपसा करून पुरविण्यात येते महा पालिका अस्तित्वात आल्या नन्तर विध्यमान आमदार तत्कालीन महापौर संभाजी पाटील यांच्या प्रयत्नातून १९८५ च्या दरम्यान या विहिरीची खुदाई करण्यात आली होती. गेले काही वर्षे दर सहा महिन्यास एकदा ही विहिरीतील दहा एच पी ची मीटर दुरुस्तीस येत होती. मीटर दुरुस्ती करण्यास धारवाड हून मेकॅनिक येण्यास विलंब होत असल्याने अनेकदा चार पाच दिवस या भागात पाणी पुरवठा बंद होत होता त्यामुळे पाण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत होता. शुक्रवारी नगरसेविका सरिता पाटील यांनी नवीन मीटर पूजा करून नवीन मीटर च लोकार्पण केलं