बेळगाव विमान तळाच विस्तारीकरणात करण्यात आलं असून तब्बल 142 कोटी खर्च करून नवीन टर्मिनल बिल्डिंग,ए टी सी सह रनवेत वाढ अस विस्तारीकरण करण्यात आलं आहे.नवीन विमान तळाच विस्तारीकरण योजना भाजपच्या कार्यकाळात अमलात आली असली तरी याची सुरुवात 2006 च्या दरम्यान यु पी ए च्या कार्यकाळात झाली होती.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी देखील यात लक्ष घातले होते आणि सुरुवातीचे 22 कोटी निधी तात्कालीन नागरी विमान उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मंजूर केले होते आणि विस्तारीकरणाचा पाया याच काळात रोवला गेला होता.
विमानतळ विस्तार करण्यासाठी बेळगावातूनही स्थानीकांनी पाठपुरावा केला होता तालुका समितीचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामचंद्र मोदगेकर यांनी पाठपुरावा केला होता. 2006 मध्ये प्रफुल्ल पटेलांनी मोदगेकर यांना पत्र लिहून सांबरा विमान तळ विस्तारीकरणात लक्ष घालत असल्याचं कळवलं होत तर खासदार अंगडी यांनी देखील बेळगावातून विमान सेवा सुरू करण्यासाठी पत्र दिले होते.
मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे खासदार आमदारांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असताना बेळगाव विमानतळ विस्तारीकरणात यु पी ए सरकारचं योगदान देखील समोर आलं आहे.ज्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी 2006 मध्ये 22 कोटी मंजूर केले होते तेंव्हा विजापूरवाला म्हणून एक ठेकेदाराने काम केलं होतं यात राष्ट्रवादी काँग्रेस चा यु पी ए सरकारचा देखील सहभाग आहे अशी प्रतिक्रिया रामचंद्र मोदगेकर यांनी दिली आहे.