बेळगाव विमान तळाच्या विस्तारिकरणात सांबरा येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ध्या मगच विमान तळाच उदघाटन करा अशी मागणी सांबरा येथील शेतकरी दिलीप चव्हाण आणि भागन्ना सनदी यांनी केली आहे
विमान तळावर पत्रकार परिषदेत या शेतकरी नेत्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
एकूण 370 एकर संपादित जमिनी पैकी 250 एकर जमिनीचे 35 लाख प्रति एकर नुकसान भरपाई द्या असा आदेश जिल्हा कोर्टाने नोव्हेम्बर 2016 मध्ये दिला होता कोर्टाचा आदेश असून देखील एक वर्ष जगाला तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नसल्याची बाब शेतकऱ्यांनी एअरपोर्ट अधिकारी आणि खासदारांच्या निदर्शनास आणून दिली.
शेतकरी भागाना सनदी यांची 14 एकर जमीन संपादित केली असून त्यांनी नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्त्या करायला दोरी तरी द्या अशी भूमिका घेताच उपस्थित खासदार कोरे अंगडी यांनी प्रांत अधिकारी कविता योगप्पन्नावर यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी सूचना केली .
Trending Now