बेळगाव कॅटोंमेंट बोर्डाच्या वतीनं स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
स्वच्छता हीच सेवा या अभियाना अंतर्गत 12 सप्टेंबर ते 2 ऑक्टोम्बर दरम्यान स्वच्छ भारत योजना राबविण्यात येत आहे. ब्रेगेडिअर गोविंद कलवाड,सी ई ओ दिव्या शिवराम, यांच्यासह कॅटोंमेंट सदस्यांनी बस स्थानकावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शवून मोहिमेची सुरुवात केली.
रेल्वे स्थानक बस स्थानकावर या मोहिमेचा उदघाटन कार्यक्रम पार पडला सकाळी 9 ते 11या वेळेत छावणी सीमा परीषदेच्या वेगवेगळ्या ठिकाणी ही स्वछता मोहीम राबविली जात आहे वेगवेगळ्या शाळा कॉलेजचे 100 विध्यार्थी मोहीमेत सहभागी झाले होणार आहेत. सात वार्डातुन दररोज 20सप्टेंबर पर्यंत स्वच्छता मोहीम केली जाणार असून 21 रॅली काढली जाणार आहे अशी माहिती सी इ ओ दिव्या शिवराम यांनी दिली आहे.