माजी महापौर आणि तालुका समितीचे नेते शिवाजी सुंठकर यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असून लवकरच याला मुहूर्त मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुंठकर भाजप प्रवेश करणार अशी माहिती येत होती अनेकदा त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुरप्पा यांची भेट देखील घेतली होती मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. भाजप हाय कमांडनी सुंठकर यांच्या प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला असून आगामी दसऱ्याच्या निमिताने बेळगावात त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे.
गेल्या कित्येक महिन्यापासून ग्रामीण भागातला एक आमदार,विधान परिषद सदस्य आणि राज्य सभा खासदार यांनी सुंठकर यांना भाजप प्रवेश देण्यासाठी प्रयत्न चालवले होते.
भाजप च्या विश्वसनीय सूत्रांनी बेळगाव live ला दिलेल्या माहितीनुसार सुंठकर दसऱ्याच्या मुहूर्तावर पक्ष प्रवेश होणार असून त्यांना विधान सभेची उमेदवारी देण्याची शक्यता खूप कमी आहे.सुंठकर यांनी गेल्या दोन विधानसभा निवडणुका समितीच्या तिकिटावर लढवल्या होत्या ग्रामीण भागात दोन मराठी उममेदवार झाल्याने समितीला पराभवाचा सामना करावा लागला होता. मागील दोन्ही विधानसभा लढलेल्या ना सोडून तिसऱ्या कुणालाही समितीच तिकीट ध्या अशी मागणी वाढू लागल्याने सुंठकर यांनी भाजपचा रस्ता पकडला असल्याचे बोलले जात आहे.