बैलहोंगल तालुक्यातील वन्नूर गावातल्या अडीच वर्षाच्या चिमुरड्या बालिकेवर बलात्कार करून पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष नायक या नरधामास फाशी द्या अशी मागणी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख रवींद्र गडादे यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
बलात्कार केलेली ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून अश्या आरोपीस फाशीच दिली पाहिजे असं निवेदनात म्हटले आहे यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर,माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह विविध महिला संघटनेच्या पदाधिकारी,कॉलेज विध्यार्थीनी आदी यावेळीउपस्थित होते.