शुक्रवारी रात्री जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कोर्ट रोडवरील बॅरिकेट्स वकिलांनी जे सी बी लावून हटवले आहेत.
सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आंदोलन करत जे सी बी लावून बॅरिकेट्स हटवून जिल्हा प्रशासन विरुद्ध वकील अस सूरु असलेलं युद्ध सध्या तरी वकीलानी जिंकल आहे.
सकाळी 11 वाजल्या पासून शेकडो वकील रोड वर निदर्शन करत होते या रोड वर ट्रॅफिक जॅम सुद्धा झाला होता. अनेकदा वकील आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होत्या शेवटी वकिलांनी जे सी बी आणून दुपारी दीड वाजता हे बॅरिकेट्स हटवले आहेत.
आंदोलनावेळी हाताने बॅरिकेट्स काढण्याचा प्रयत्न झाला मात्र ते न निघाल्याने शेवटी जे सी बी चा वापर करत बॅरिकेट्स हटवले आहे. वकीला वर देखील सार्वजनिक संपत्ती नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद होतोय का अशी चर्चा सामान्य लोकांत सुरू आहे